Ad will apear here
Next
कॅपिटावर्ल्डतर्फे स्मार्ट लोन डिसइंटरमिडेशन इकोसिस्टम
मुंबई : ‘कॅपिटावर्ल्ड’ या आघाडीच्या डिजिटल मंचातर्फे, संपूर्ण लोन व्हॅल्यू चेन असलेल्या, क्रांतिकारी अशा ‘स्मार्ट लोन डिसइन्टरमिडेशन इकोसिस्टम’च्या पहिल्या व्हर्जनची यशस्वी सुरूवात केल्याची घोषणा करण्यात आली. 

पूर्णतः एकात्मिक अशा या कर्ज देण्याच्या पध्दतीचा आता छोट्या आणि मध्यम कंपन्यांना कर्ज मिळवण्यासाठी लाभ होणार आहे. त्याचबरोबर ही इकोसिस्टम बँका, एनबीएफसीज यांच्यासाठी लाभाची असेल.  कारण या इकोसिस्टममुळे बँकांच्या क्रेडिट देण्याच्या पध्दतीला एक शिस्त लागून, व्यक्तीच्या बदलणाऱ्या भुमिकांवर चाप लागू शकेल.  या उपक्रमाच्या यशस्वी उपयोगामुळे नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स (एनपीए) कमी होऊन, कर्ज वितरणाच्या पध्दतीत पारदर्शकता, माहितीचे संशोधन आणि कृत्रिम बुध्दीमत्ता येईल. 

या स्मार्ट लोन - डिसइंटरमिडेशन इकोसिस्टममुळे, एमएसएमईजचा संपूर्ण कर्ज घेण्याच्या प्रणालीतील वेळ ७० टक्क्यांनी कमी होणार आहे.  कर्ज मिळण्यासाठी जो आधी काही महिन्यांचा वेळ लागत असे, तो आता काही तासांवर आला असून, रिअल टाईम पध्दतीने कर्ज उपलब्ध होणार आहे. यामुळे लोक बँका किंवा एनबीएफसीजकडून केवळ एक फॉर्म भरून कर्ज मिळवू शकतील.  यामध्ये असलेल्या सिस्टममुळे फंड देणाऱ्या कंपनीला मान्यता देणे, पास करणे आणि स्कोअरिंग पाहणे सोपे झाल्याने, वित्तसंस्था शाखेचा खर्च ६० टक्क्यांनी कमी होणार आहे. यातील कागदोपत्री कामदेखील ८० टक्क्यांनी कमी होणार आहे.  या सिस्टममध्ये अॅनेलिटिक्स असल्याने, तपासणी आणि क्रेडिट रिस्क स्कोअरिंग सोपे होईल; कारण यात असलेल्या विविध पार्टनर बँका आणि एनबीएफसी आपल्या धोका पत्करण्याच्या क्षमतेनुसार कर्ज घेणाऱ्याची क्षमता पडताळून पाहू शकतील.

कॅपिटावर्ल्डचे संस्थापक आणि प्रवर्तक जिनांद शहा यांनी याचे फायदे सांगितले. ते म्हणाले, ‘मध्यम आकाराच्या लोकांसाठी आम्ही एक नाविन्यपूर्ण अशी पध्दती शोधून काढली आहे. कागदोपत्री काम आणि पारदर्शकता देणारी कोणतीच पध्दत अस्तित्वात नव्हती.  कॅपिटावर्ल्डकडून आता एमएसएमईजना नवीन आणि वेगवान अशी सुविधा देण्यात येत आहे. यामुळे आता एमएसएमई अर्थपुरवठा मिळवण्यासाठी थेट जोडले जाऊ शकतात.’

या उपक्रमाविषयी बोलताना एनएचबीएस ग्रुपचे चेअरमन शैलेश हरिभक्ती यांनी सांगितले, ‘एमएसएमईजसाठी हा नवीन कर्ज उपलब्ध करून देणारा मंच निर्माण होणार असून, यामुळे आता कर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आणि सहज होणार आहे.  कॅपिटावर्ल्डने जगातील पहिल्या एंड टू एंड कनेक्टेड आणि संपूर्णतः एकात्मिक अशा पध्दतीचा विकास केला आहे. यात बाजारपेठेतील ड्यू डिलिजन्स वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या मंचामुळे आता एमएसएमईजना त्यांचा वेळ आणि उर्जा वाचवणे शक्य होणार आहे.’     

या वेळी आयबीएचे माजी प्रमुख मोहन टंकसाले उपस्थित होते. ते म्हणाले, ‘अशा प्रकारच्या पध्दतींचा कर्ज घेणारे आणि देणारे या दोघांना चांगला लाभ होणार आहे. कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या लाखो मध्यम आकाराच्या व्यवसायांना लाभ होऊ शकेल ,कारण त्यांना सोप्या आणि पारदर्शक पध्दतीने कर्ज मिळण्याचे पर्याय खूप कमी असतात.’ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZYLBM
Similar Posts
छोट्या उद्योगांच्या कर्जविषयक घडामोडींचा अहवाल मुंबई : ‘सिडबी’ने ‘ट्रान्सयुनियन सिबिल’च्या सहयोगाने देशातील एमएसएमई श्रेणीचा बारकाईने मागोवा घेण्यासाठी व पाहणी करण्यासाठी ‘एमएसएमई पल्स’ हा एमएसएमईच्या कर्जविषयक घडामोडींविषयीचा तिमाही अहवाल जाहीर केला आहे. हा अहवाल औपचारिक कर्जसुविधा उपलब्ध असलेल्या, भारतीय बँकिंग व्यवस्थेमध्ये लाइव्ह कर्जसुविधा
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या कर्जांमध्ये झपाट्याने वाढ मुंबई : डिसेंबर २०१८मध्ये संपलेल्या तिमाहीत व्यावसायिक कर्जांत १४.४ टक्के वार्षिक वाढ झाल्याचे ‘ट्रान्सयुनियन सिबिल-सिद्बी एमएसएमई पल्स’ अहवालाच्या पाचव्या आवृत्तीमध्ये नमूद करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) दिलेल्या एकूण कर्जांमध्ये (एंटिटी व व्यक्ती अशा
‘एमएसएमई’च्या कर्जमागणीत वाढ; थकीत कर्जात घट मुंबई : देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये कर्ज घेण्याचे प्रमाण मार्च २०१९ अखेर संपलेल्या तिमाहीत १२.४ टक्के वार्षिक दराने वाढले आहे. कर्ज घेण्याचा एकूण वार्षिक चक्रवाढ दर हा मार्च २०१५ ते मार्च २०१९ या पाच वर्षांच्या काळात १३.३ टक्क्यांनी वाढून ही पातळी आता २५३ लाख कोटी रुपये इतकी झाली आहे.
‘येस बँके’तर्फे ‘येस जीएसटी’ सुविधा सुरू मुंबई : येस बँक या भारतातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खासगी बँकेने मायक्रो, स्मॉल अँड मीडिअम एन्टरप्रायजेससाठी (एमएसएमई) ‘येस जीएसटी’ ही ओव्हर ड्राफ्ट (ओडी) सुविधा सुरू केल्याची घोषणा केली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language